
व्यसन करणाऱ्या लोकांना व्यसनांपासून दूर नेण्यासाठी आणि समाजात जागरुकता पसवण्यासाठी मुंबईतील बदलापूर येथे राहणारा सचिन गायकवाड नावाचा एक तरुण प्रयत्न करत आहे. यासाठी ठिकठिकाणी व्यसनमुक्ती अभियान पथनाट्यही सादर करत असून या पथनाट्याचे आता 500 प्रयोग पूर्ण झाले आहेत. व्यसनमुक्ती अभियान पथनाट्यासाठी त्याला अनेक खेडेगावांमध्ये आणि शाळा, महाविद्यालयांमध्येही आमंत्रित केले जाते. सचिन गायकवाड याचे ‘भोजन कट्टा’ नावाचे पोळीभाजी केंद्र असून लोकांची भूक भागवल्यानंतर राष्ट्रसेवा म्हणून जनजागृती करण्यासाठी तो पथनाट्य करतो.
































































