
सामना ऑनलाईन । नाशिक
तरुणांना भेडसावणाऱ्या समस्या, त्यांचे विचार आणि त्यांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी ‘आदित्य संवाद’ ही मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत ते रविवारी नाशिक येथे तरुणांशी संवाद साधणार आहेत.
येथील डोंगरे वसतिगृह मैदानावर सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. राजकारणासह विविध क्षेत्रांसंबंधी तरुणांचे काय मत आहे, हे आदित्य ठाकरे यावेळी जाणून घेतील. या कार्यक्रमास मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, युवा सेनेचे विस्तारक अमित पाटील, युवा जिल्हाधिकारी राहुल ताजनुपरे, दीपक दातीर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.


























































