कलाकारांना आदित्य ठाकरे यांचा सल्ला, प्रमोशन करण्याआधी फॅक्ट चेक करा

दक्षिणेकडील अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने अलिकडेच मुंबई ट्रान्स हार्बर मार्ग म्हणजेच अटल सेतूच्या कामाचे कौतुक केले आहे. या सेतूवरून प्रवास करताना तिने एका प्रसारमाध्यमाला मुलाखत दिली. या मुलाखतीत ती भाजपचे कौतुक करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी रश्मिका पेड प्रमोशन करत असल्याचा आरोप केला.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी ही जाहीरात बघितली असून त्यांनी कलाकारांना एक सल्ला दिला आहे. त्यासाठी आदित्य ठाकरे यांनी X या समाजमाध्यमावर एक पोस्ट शेअर केली आहे. रश्मिकाने केलेले काही दावे चुकीचे असल्याचे सांगत त्याबाबतचे सत्य देखील या पोस्टमधून आदित्य ठाकरे यांनी मांडले आहे.

”मी नुकतीच एका कलाकाराची मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवरील एक जाहीरात बघितली (कदाचित ती पेड असू शकते). या जाहिरातीत नसलेले काही महत्त्वाचे मुद्दे मी इथे मांडतोय. 1) अटल सेतू – मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे 85 टक्के काम हे जून 2022 पर्यंत म्हणजेच आमचे सरकार पाडण्याआधीच झालेले होते. जे काम झाले ते महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात झाले. 2) उरलेले 15 टक्के काम पूर्ण करायला भाजपच्या नेतृत्तवातील खोकेक सरकारला 2022 ते 2024 असे दोन वर्षाचा वेळ लागला. त्यानंतर मुद्दामून या मार्गाच्या लोकार्पणाला उशीर केला. 3) मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा पूर्णपणे तयार झाल्यानंतर तीन महिन्यांनी त्याचे लोकार्पण करण्यात आले. का तर यांना व्हिआयपी लोकांच्या तारखा मिळत नव्हत्या. त्यासाठी त्यांनी मुंबईचा विकास रोखून ठेवला, असे काही महत्त्वाचे मुद्दे आदित्य ठाकरे यांनी या पोस्टमधून मांडले.

यासोबतच आदित्य ठाकरे यांनी कलाकारांना अशा प्रकारचे प्रमोश करण्याआधी सत्य काय आहे ते जाणून घेत चला असे आवाहन केले आहे. ” या जाहिरातीत संबंधिक कलाकार अखेरीस जनतेला आवाहन करते की जागे व्हा आणि विकासाला मत द्या. तिने हे असं म्हटलं ते बरंच झाला. कारण विकासाला मत म्हणजे भाजपला मत देऊ नका. पण माझी अशा प्रकारचे प्रमोशन करणाऱ्या कलाकारांना विनंती आहे की तुम्ही अशा जाहिराती करण्याआधी सत्य काय आहे ते तपासा. काही पक्ष कलाकारांना वॉर रुकवा दि ना पापा अशा प्रकारच्या जाहीराती करायला लावत आहेत, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी भाजपचा समाचार घेतला.