आदित्य ठाकरे चंद्रपुरात, ऐतिहासिक रामाळा तलावाची केली पाहणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे आज चंद्रपुरमध्ये आले होते. त्यांनी शहरातील गोंडकालीन रामाळा तलावाच्या खोलीकरण- सौंदर्यीकरण कामाची पाहणी केली. या ऐतिहासिक तलावाची दुर्दशा झाली असून, जलपर्णी आणि सांडपाण्यामुळे तिथे प्रदूषण वाढले. ईको प्रो पर्यावरण संस्थेने ही परिस्थिती लक्षात आणून दिल्यावर आदित्य ठाकरे यांनी तातडीने या तलावाच्या खोलीकरण व सौंदर्यीकरणासाठी निधी मंजूर केला. आज त्याच कामाची पाहणी त्यांनी केली.

सोबतच 12 किमी लांबीच्या किल्ला परकोटावर ‘हेरिटेज वॉक’ला चालना देण्यासाठी इको प्रो संस्थेने दिलेल्या सूचनांवर अंमलबजावणी करण्याचे निर्देश यावेळी ठाकरे यांनी दिले. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार सोबत होते. यावेळी बोलताना ठाकरे यांनी जिल्ह्यातील प्रदूषण थांबवण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात असल्याची माहिती देत रामाळा तलावाच्या सौंदर्यीकरणामुळे पर्यटन विकसित होईल, अशी आशा व्यक्त केली.