आदित्य ठाकरेंनी घेतली रेल्वे मंत्र्यांची भेट, महत्त्वाच्या प्रश्नांवर झाली चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ashwin-kumar-aaditya-thackeray

 

रेल्वे ही मुंबईची लाइफलाईन आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचे प्रश्न आणि अन्य महत्त्वाच्या प्रश्नांसंदर्भात राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. मुंबईकरांच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर या दोघांमध्ये बराचवेळ चर्चा सुरू होती.

‘मुंबईत जे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड लॉन्च करण्यात आले आहे त्यावर महत्त्वाची चर्चा झाली. जर रेल्वेसोबत याचे ‘इंटीग्रल कनेक्शन’ झाले तर प्रवाशांसाठी ते अधिक फायदेशीर ठरेल. या पर्यायाचे रेल्वे मंत्र्यांनी स्वागत केले’, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांनी दिली.

आदित्य ठाकरे हे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी शिवसेना खासदार अनिल देसाई आणि खासदार प्रियांका चतुर्वेदी देखील उपस्थित होते.