SSC Result – पालिका शाळांचा 96.74 टक्के निकाल; आदित्य ठाकरेंनी केले कौतुक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील महानगरपालिकेच्या शाळांचा दहावीचा निकाल 96.74 टक्के लागला आहे. पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वात मुंबई महानगरपालिकांच्या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले. आदित्य ठाकरे यांनी आज ट्विट करत महानगर पालिका शाळांच्या निकालाचे कौतुक केले आहे. ‘मला हे सांगायला फार अभिमान वाटतोय की आपल्या महानगरापालिका शाळांचा निकाल 96.74 टक्के लागला आहे. चांगल्या प्रकारचे शिक्षण देणे व शैक्षणिक प्रगतीसाठी विद्यार्थ्यांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्याच्या आमच्या प्रयत्नांना येत असलेले यश यातून दिसून येतेय”, असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल आज जाहीर झाला. राज्याचा निकाल 96.94 टक्के लागला असून बारावीप्रमाणेच दहवीच्या परिक्षेतही मुलींनीच बाजी मारली. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 99.27 टक्के लागला  तर नाशिक विभागाचा निकाल सर्वात कमी लागला म्हणजेच 95. 90 टक्के लागला आहे.