आता चंद्रावर जरी निवडणूका झाल्या तरी भाजपवाले तिथे मतदान करतील अशी सिस्टम त्यांनी बसवलीय, आदित्य ठाकरे यांची टीका

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजप व निवडणूक आयोगावर जोरदार ताशेरे ओढले. ‘2014 आधी भाजपला देखील बॅलोट पेपरवरच निवडणूका घ्यायच्या होत्या मात्र त्यानंतर त्यांना असं काही जिंकायचं असं रसायन काढलं की आता त्यांनी आता त्यांनी चंद्रावर जरी निवडणूका घेतल्या तरी भाजपवाले तिथे मतदान करतील, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केली.

”या आधी बॅलोट पेपरवर निवडणूका होण्यासाठी भाजपने देखील मागणी केलेली होती. 2014 च्या आधी भाजप देखील बॅलोटवरच निवडणूका हव्या होत्या मात्र 2014 नंतर असं काही जिंकायचं असं रसायन काढलं की आता त्यांनी आता त्यांनी चंद्रावर जरी निवडणूका घेतल्या तरी भाजपवाले तिथे मतदान करतील. आम्ही निवडणूकीत झालेली मतचोरी समोर आणली आहे. कुणी पाच वेळा मतदान करतंय. मिनता देवी ही महिला हिचं वय 124 वर्ष दाखवत आहे पण फोटो वरून त्या 25 वर्षांच्या दिसत आहेत. असे अनेक घोळ आम्ही पकडलेले आहेत. यासोबतच मागच्या आठवड्यात पत्रव्यवहार केला आहे. व्हीव्हीपॅट काढून टाकँण्याचा प्रयत्न ईसी करत आहेत. निवडणूक आयोगाने ठरवायचं की निवडणूका घ्यायच्या की त्यांच्या ओळखी पाळखीचे लोकंच जिंकायला हवे आहेत, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. ”मतचोरी विरोधात संपूर्ण देशभरात आंदोलन होणार. पण निवडणूक आयोगाचं मुख्य कार्यालय दिल्लीत आहे, मुख्य निर्लज्जपणा दिल्लीतून होतोय. त्यामुळे तिथे सध्या आंदोलन सुरू आहे’, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

“मतचोरी आम्ही हवेत बोलत नाहीत. अनेक लोकांचे पुरावे दाखवले आहेत. ही सगळी मतचोरी आहे. ज्यामुळे भाजप गेल्या पाच सहा वर्षांपासून जिंकतेय. सर्वोच्च न्यायालयाने त्याबाबत मतदारांची यादी मागितली तर निवडणूक आयोगाने ती दिली नाही. मग काय निवडणूक आयोग पण सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठा आहे का ? आमचा हा अधिकार आहे की निवडणूक आयोगाने आम्हाला उत्तर द्यावं, असंही आदित्य ठाकरे यांनी ठणकावले