त्यांना स्वत:चीच लाज वाटते, आदित्य ठाकरे यांचा मिंधे गटावर हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांनी आज ट्विटरवरून मिंधे गटावर व निवडणूक आयोगावर हल्ला बोल केला. त्या सर्वांना स्वत:चीच लाज वाटते, अशा शब्दात त्यांनी मिंधे गटाला फटकारले आहे.

”EC- Entirely Compromised institution संपूर्ण तडजोड केलेली संस्था ही लोकशाहीला संपवू इच्छिते. चोरांच्या टोळीला कायदेशीर ठरवून चोरी कायदेशीर ठरत नाही. या लोकांकडे लपविण्यासाठी, चोरण्यासाठी आणि इतरांची ओळख वापरण्यासाठी खूप काही आहे. कारण त्यांना स्वत:ची लाज वाटते” असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

त्यांच्या या ट्विटवर निष्ठावंत शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दर्शवला आहे. काळजी नसावी आपण शून्यातून सगळं पुन्हा उभे करू असे शिवसैनिकांनी ट्विट केले आहे. तर काहिंनी निवडणूक आयोग हे आता भाजपचे एजंट झाल्याची टिकाही केली आहे.