
हुकूमशाहीने सत्ता मिळवलेले सत्ताधारी आता साधी सिनेट निवडणूक घ्यायला घाबरतात, असा सणसणीत टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी लगावला. सध्या राज्यात दादागिरीचे राजकारण सुरू आहे. ते साफ केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
आदित्य ठाकरे यांनी नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना राज्यातील राजकारणावर भाष्य केले. मिंधे गटातील कोणासाठी दरवाजे उघडे ठेवायचे, कोणासाठी बंद ठेवायचे याचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील. सध्या गद्दार गँगची वागणूक वेगळीच आहे. पत्रकाराला धोपटलं जातं, उद्योजकाचे अपहरण होतेय. हे दादागिरीचं राजकारण साफ केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
सत्ताधाऱयांना ‘इंडिया’ची धास्ती
‘इंडिया’त सर्व देशभक्त पक्ष एकत्र आले असून सत्ताधाऱयांनी धास्ती घेतली आहे. राज्यात महाविकास आघाडीसुद्धा देशासाठीच एकत्र आली आहे. आम्ही एकजुटीने काम करत आहोत, राजकीय भेदभाव करणार नाही, स्वार्थ पाहणार नाही, असे ते म्हणाले.




























































