पालिकेच्या विद्यार्थ्यांना मिळणार हायटेक शिक्षण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण मिळणार आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱया ‘बायजूस’ संस्थेसोबत दावोसमध्ये पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत आज सामंजस्य करार करण्यात आला.

पालिका शाळांत शिकणाऱया विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि अत्याधुनिक शिक्षण मिळण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये आता दावोस (स्वित्झर्लंड) येथे आयोजित जागतिक आर्थिक परिषदेत (वर्ल्ड इकॉनॉमिक पह्रम) झालेल्या करारामुळे पालिकेच्या विद्यार्थ्यांना ‘बायजूस’ संस्थेचे ‘लर्निंग अॅप’ व इतर सेवा प्रणाली या विनामूल्य वापरासाठी उपलब्ध होणार आहेत. तर पालिकेच्या शाळांमध्ये शिकवणाऱया शिक्षकांनादेखील ‘बायजूस’ संस्थेद्वारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या सामंजस्य करारप्रसंगी अतिरिक्त मुख्य सचिव आशीष सिंह, ‘बायजूस’ संस्थेचे बायजू रविंद्रन उपस्थित होते. तर पालिका आयुक्त-प्रशासक इकबाल सिंह चहल, शिक्षण सहआयुक्त अजित पुंभार ऑनलाइन सहभागी झाले.

या सुविधा मिळणार
पालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी मोफत व दर्जेदार शिक्षण मिळण्याकरिता व्हर्च्युअल क्लासरूम, डिजिटल क्लासरूम, टॅब, कॉम्प्युटर लॅब, सायन्स लॅब, एस्ट्रॉनॉमी लॅब, संगीत-कला-क्रीडा अशा विविध उपक्रमाद्वारे शिक्षण दिले जात आहे. तर आता ‘बायजूस’च्या सोबतीने विद्यार्थ्यांना टॅब, मोबाईल, संगणकाच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण सहज आणि सोप्या पद्धतीने उपलब्ध होणार आहे.