मुंबईकरांचा 700 स्क्वेर फुटापर्यंतचा मालमत्ता कर राज्य सरकारने माफ करावा, आदित्य ठाकरे यांची सभागृहात मागणी

मुंबईकरांचा 700 स्क्वेर फुटापर्यंतचा मालमत्ता कर राज्य सरकारने माफ करावा, अशी मागणी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज विधानसभेत केली. विरोधी पक्षाचा प्रस्ताव मांडत त्यांनी ही मागणी केली आहे. यावेळी बोलताना ते म्हणले आहेत की, “मुंबईकर पुणेकर, नाशिककर, हे शहरांच्या समोर कर लावण्याचा जो प्रश्न आहे किंवा एक भूत वर्षानवर्षांचं आहे, ते काही थांबत नाही. “

आदित्य ठाकरे म्हणाले, “राज्यात आमचं सरकार होतं, तेव्हा मुंबईसाठी आम्ही ५०० स्क्वेर फुटांपर्यंतचा मालमत्ता कर माफ केला होता. माझी मागणी आहे की, आताची जी परिस्थिती आहे, मुंबईकरांवर जितका कर लादला जात आहे, तो कर कमी करून ५०० स्क्वेर फुटांवरून राज्य सरकारने 700 स्क्वेर फुटापर्यंतचा मालमत्ता कर माफ केला पाहिजे. यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळेल.

ते म्हणाले, “नाही तरी, प्रॉपी टॅक्स मध्ये बाकीचे जे एलिमेंट आहेत, ज्यात स्ट्रीट टॅक्स, ट्राफिक टॅक्स, स्ट्रीट लाईट वगैरे, या सगळ्यांमुळे मुंबईकरांचे हाल आहेच. पण हे सगळं होतं असताना नवीन कचराकर, ज्याला मी अदानीकर म्हणतो. ते देवनार डंपिंग ग्राउंड साफ करण्यासाठी जो कचराकर लावण्यात आला आहे, तो कधीही मुंबईच्या इतिहासात लावण्यात आला नव्हता. तो प्रत्येक महिन्याला निवडणुकीनंतर लावला जाईल, असं सगळीकडे स्पष्ट झालेलं आहे. “