‘आप’चे भाजपविरोधात वॉशिंग मशीन कॅम्पेन; मोदी सरकार ईडी आणि सीबीआयचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप

लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने भाजपविरोधात वॉशिंग मशीन कॅम्पेन सुरू केले आहे. आजपासून या मोहिमेला आपचे नेते गोपाल राय आण सौरभ भारद्वाज यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. मोदी सरकार ईडी आणि सीबीआयचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप माध्यमांशी संवाद साधताना केला.

मोहिमेदरम्यान आपच्या कार्यकर्त्यांनी एक नाटकही सादर केले. या नाटकात भाजप नेते अशोक चव्हाण, हेमंत बिस्वा सरमा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, आपचे नेते मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, संजय सिंह, झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या भूमिका ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी वठवल्या. मोदी सरकार विरोधी नेत्यांवर कशा प्रकारे ईडी, सीबीआयच्या माध्यमातून कारवाई करून त्यांना भाजपात सहभागी केल्यावर मशीनमध्ये टापून कसे स्वच्छ केले जात आहे ते दाखवण्यात आले.