गव्हर्नर साहेब, दिल्ली बुडतेय; तुम्ही आहात कुठे ? आपचा खोचक सवाल

दिल्लीत यमुना नदीने रुद्रावतार धारण केल्यामुळे दिल्लीसह अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. असंख्य घरे पाण्याखाली गेली असून त्यामुळे हजारो लोकांना सुरक्षित स्थळी जावे लागले आहे. नदीचे पाणी दिल्लीच्या मंत्रालयापर्यंत पोहोचले असून मेट्रो रेल्वे स्थानकात तर धबधब्यासारखी परिस्थिती झाली होती. यावरून आम आदमी पार्टीने दिल्लीतील भाजप व राज्यपाल व्ही के सक्सेना यांना फटकारले आहे.

”एलजी साहब, दिल्ली पुरात बुडतेय. तुम्ही आहात कुठे? दिल्लीतले भाजपचे चार इंजिनचे सरकार सत्तेत येऊन सात महिने होत आले आहेत आणि शहर अगदी छोट्याशा पावसाने भरून गेलंय, असे आपने म्हटले आहे.

”2023 ला राज्यपाल साहेब रस्त्यावर फिरत मुलाखत देत होते, पत्र लिहत होते, अनेक सल्ले देत होते. आता मात्र आता ते अगदी शांत आहेत. आता काय झालंय त्यांना? असा सवाल भाजप आमदार सौरभ भारद्वाज यांनी केला आहे.

आपने दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचा AI जनरेटेड व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात दिल्लीतील पूराचा व्हिडीओ आणि सोबत रेखा गुप्ता यांचा झोपलेल्या अवस्थेतील एआय जनरेटेड फोटो शेअर केला आहे. सोबत ‘रेखा गुप्ताजी, जाग्या व्हा. तुमचे प्रॉपर मॅनेजमेंट दिल्लीवर भारी पडतेय’, असा टोला देखील या पोस्टसोबत लगावला आहे.

यमुना नदीने रुद्रावतार धारण केल्यामुळे दिल्लीसह अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. असंख्य घरे पाण्याखाली गेली असून संतताधर पावसामुळे यमुनेच्या पाण्याची पातळी झपाटयाने वाढत आहे. नदीपात्राने धोक्याची पातळी ओलांडली असून 200.41 वर पाणी पातळी पोहोचली आहे.

63 वर्षात यमुनेने चौथ्यांदा ही धोक्याची पाणीपातळी गाठली आहे. त्यामुळए हजारो लोकांना सुरक्षित स्थळी जावे लागले आहे. सकाळी नदीचे पाणी दिल्ली मंत्रालयापर्यंत पोहोचले. मयूर बिहार फेज-1 मधील शिबीरातही पाणी घुसले, स्वामी नारायण मंदिर, फुट ओव्हर ब्रिज, सिव्हिल लाईन या भागातील बंगलेही पाण्याखाली गेले.