
अंबाजोगाई शहराच्या उत्तरेस असलेल्या बालाघाट डोंगर रांगातील मुकुंदराज समाधी परिसरात वन विभागाने तयार केलेल्या व्हिव पॉईंटवरून खाली दरीत उडी मारून वीस वर्षीय तरूणाने जीवन संपवले. ही धक्कादायक घटना 31 ऑक्टोबर सकाळी पावणे आठच्या सुमारास घडली. दिनेश नरेश लोमटे (राहणार कोष्टी गल्ली, अंबाजोगाई) असे या तरुणाचे नाव आहे.
तीन वर्षांपूर्वी वडिलांचे आजारीपणात निधन झाल्याने दिनेश निराश झाला होता असे त्यांचे निकटवर्तीय सांगत आहेत. आज सोमवारी सकाळी तो घरातून पळत सुटला, पाठीमागे त्याची आई पण धावत होती. हे दृश्य मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांच्या निदर्शनास आले. मॉर्निंग वाकला गेलेल्या काही लोकांनी त्याला अडवून समजावण्याचा प्रयत्न केला परंतू त्यांना हुलकावणी देऊन बालाघाट डोंगर रांगेत असलेल्या आद्यकवी मुकुंदराज समाधी स्थळ परिसरातील पिकनिक पॉईंटवरून खोलदरीत उडी घेत आपले जीवन संपवले.



























































