लाल सिंग चढ्ढानंतर ‘या’ चित्रपटात दिसणार आमीर खान…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान हा वर्षाला एकच चित्रपट करतो त्यामुळे त्याच्या चित्रपटाची चाहत्यांना जबरदस्त उत्सुकता असते. लॉकडाऊनमुळे रखडलेला आमीर खानचा लाल सिंग चढ्ढा हा या वर्षी ख्रिसमसच्या मुहुर्तावर रिलीज होणार आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना हे आमीरला मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी हे पूर्ण वर्ष वाट पाहावी लागणार आहे.

aamir-khan-look

मात्र पुढच्या वर्षीची परिस्थिती काहीशी वेगळी असू शकते. वर्षाला एक चित्रपट करणाऱ्या आमीरच्या हातात सध्या तीन सिनेमे आहेत. लाल सिंग चढ्ढाचे शूटींग संपल्यावर आमीर स्पॅनिश चित्रपट चॅम्पियनच्या रिमेकमध्ये दिसणार आहे. त्यात तो दारुचे व्यसन असलेल्या बास्केटबॉल कोचच्या भूमिकेत दिसणार आहे. या रिमेकचे दिग्दर्शन आर.ए, प्रसन्न करणार आहेत.

या चित्रपटासोबतच आमीरकडे गुलशन कुमार यांचा बायोपिक चित्रपट देखील आहे. तसेच आमीर आणखी एक बायोपिक करणार आहे. मात्र त्याबाबत अद्याप काहीच माहिती समोर आलेली नाही. आमीर खानने याआधी दंगलया चित्रपटाच कुस्तीपटू महावीर फोगाट यांची भूमिका केली होती.