आमीर खानचा मुलगा जुनैद करतोय चित्रपटात पदार्पण, पाहा त्याचा पोस्टर

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान याचा मुलगा जुनैद खान हा लवकरच चित्रपट सृष्टीत पदार्पण करणार आहे. जुनैदच्या पहिल्या चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. महाराज असे त्या चित्रपटाचं नाव असून तो नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix India (@netflix_in)

सिद्धार्थ पी मल्होत्राचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये जुनैद व जयदीप अहलावत दिसत आहेत. जुनैदचा लूक हा थोडा ब्रिटीशर्स सारखा असून जयदीप साधू संतांच्या लूकमध्ये दिसत आहे. दोघांचेही लूक पाहून नेटकऱ्यांची या चित्रपटाबाबतीतली उत्सुकता वाढली आहे. हा चित्रपट 1862 मधल्या घटनांवर आधारीत आहे. यात जुनैद एका पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. यात त्याच्यासोबत अभिनेत्री शर्वरी वाघही सिनेमात दिसणार आहे.

या चित्रपटाच्या पोस्टरसोबत ”सत्यासाठी एक शक्तिशाली व्यक्ती आणि एक निर्भिड पत्रकार यांच्यात लढा”, असे कॅप्शन देण्यात आले आहे. हा चित्रपट येत्या 14 जूनला नेटफ्लिक्सवर रिलीज होतोय. या चित्रपटाचे शूटींग तब्बल तीन वर्षापूर्वी पूर्ण झाले होते. मात्र अनेक अडचणींमुळे हा चित्रपट रखडला होता.