Photo – लवेंडर रंगाच्या ऑफ शोल्डर गाऊनमध्ये आमना शरीफचा ग्लॅमरस लूक

‘कही तो होगा’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली कशिश म्हणजेच आमना शरीफ आजही चाहत्यांच्या मनात घर करुन आहे, आमना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती आपले वेगवेगळे फोटो इंस्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअऱ करते. नुकतेच आमनाने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.यामध्ये तिने लवेंडर रंगाचा ऑफ शोल्डर गाऊन घातला आहे. ज्यामध्ये ती सुंदर दिसत असून तिने चेहऱ्यावर न्यूड मेकअप केलेला आहे. शिवाय केस मोकळे सोडलेले आहेत. तिच्या या फोटोंचे चाहत्यांनी कौतुक केले आहे.