सिसोदियांना तुरुंगात हवीत पुस्तके

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘मद्य धोरण’ प्रकरणाशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणात दिल्ली न्यायालयाने 14 दिवसांची कोठडी वाढवलेले ‘आप’चे नेते मनीष सिसोदिया यांना आता कोठडीत वाचण्यासाठी पुस्तके हवी आहेत. कोठडीत वाचण्यात वेळ घालवण्यासाठी पुस्तके हवी असल्याच्या मागणीसाठी त्यांनी अर्जही केला.

यावर सिसोदिया यांना कोर्टाने पुस्तके देण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, कोर्टाने कोठडी वाढवल्यामुळे सिसोदिया यांना 5 एप्रिलपर्यंत कोठडीतच रहावे लागणार आहे. कथित मद्य धोरण प्रकरणाचा तपास सीबीआय, ईडीकडून सुरू आहे. ईडीने 9 मार्च रोजी त्यांना अटक केली होती.