‘आप’ आज पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी मंगळवारी, दुपारी 12 वाजता पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करणार आहे. त्याबाबतची माहिती ‘आप’चे निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीकाल यांनी दिली आहे.

पंजाबच्या जनतेचा ‘आप’ला मोठा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या 72 तासांमध्ये 15 लाखांहून अधिक लोकांनी फोन कॉल आणि व्हॉट्सऍपच्या माध्यमातून ‘आप’ला संपर्क साधत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्याची मागणी केली आहे. त्याची दखल घेत पक्षाच्या वतीने केजरीवाल उद्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करतील, असे आपचे नेते हरपाल सिंह चिमा यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याचे नावही जाहीर केले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.