आरब्ध – दी बिगिनिंग

सामना ऑनलाईन । मुंबई

कलासमीक्षक नीता पाठारे आणि अर्थतज्ञ कलासंग्राहक हेमांग जांगला यांच्या संकल्पनेतून राबविण्यात कोबाल्ट आर्ट्सतर्फे दी ताज आर्ट गॅलरी येथे ‘आरब्ध – दी बिगिनिंग’ हे कलाप्रदर्शन ७ जूनपासून सुरू होणार आहे. या प्रदर्शनामध्ये तब्बल १९ कलाकारांच्या कलाकृती सादर केल्या जाणार असून यात जामिनी रॉय, सुनील दास, अर्पणा कौर, टी. वैकुंठम, लक्ष्मी गौड, सुहास रॉय, परितोष सेन अशा दिग्गज कलाकारांसोबत सुहास बहुलकर, रत्नाकर ओझा, अशोक भोमीक, विपत कपाडिया, औदुंबर रूद्रवार, प्रकाश घाडगे, पराग बोरसे, मनोजकुमार सावळे, असिफ शेख, डॉ. मीनल राजूरकर, वर्षा खरतमल, राजकुमार सरडे यांचाही समावेश आहे.

कोबाल्ट आर्टस् एलएलपी ही संस्था कला क्षेत्रातील गुंतवणूकदारांच्या माहितीचे संकलन करत असून त्यांना गुंतवणुकीच्या दृष्टीने योग्य ती कलाकृतींचा सल्ला देते. शिवाय ती मुंबईतील विविध पुतळे, म्युरल्स, शिल्प आदी कलाकृतीद्वारे शहर सुशोभीकरणाचे काम करत आहे. भव्य व प्रगतशील रहिवासी वा कार्यालयीन इमारतीत योग्य संकल्पनेचा वापर करून कलाकृती निर्माण करण्याचे कार्यही करीत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या