
श्री देवी सातेरी भद्रकाली देव पावणेर उत्सवानिमित्त तब्बल २४ वर्षांनंतर यंदा चौककार नाईक परिवाराच्या वतीने 11 ऑक्टोबर आणि 12 ऑक्टोबर या दोन दिवशी श्री देवी सातेरी भद्रकालीच्या पालखीचे व देव रवळनाथ भूतनाथ तरंगत आगमन देव पावणेर उत्सवानिमित्त आरोंदा, भटपावणी येथे होणार आहे. त्यामुळे हा संपूर्ण सोहळा मोठ्या दिमाखात तसेच उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.या उत्सवादरम्यान 11 ऑक्टोबर रोजी रात्री ठीक 10.30 वाजता ‘स्वरानुभव’ या उपशास्त्रीय गीतांच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता ढोल-ताश्यांच्या गजरात श्रींच्या पालखीचे (आगमन सोहळा) आयोजन करण्यात आले आहे. 8 वाजता देवतांची विधिवत पाद्यपूजा आणि 9 वाजता स्थानिक भजनी मंडळाचे भजन आयोजित करण्यात आले आहे. दुसऱ्या दिवशी 12 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजता हरिदास महाले, आळंदी यांचे श्रवणीय भजन, 11 वाजता देवी-देवतांचे दर्शन तसेच ओटी भरणे, 1 वाजता महाप्रसाद, दुपारी 3 वाजता महिलांसाठी फुगड्या, 4 वाजता स्थानिक तसेच निमंत्रितांचे भजन, आणि 7 वाजता श्रींच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमास उपस्थित असे आवाहन चौककार नाईक परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.


































































