वाघाच्या हल्यात चेक आष्टा येथील इसम ठार

चंद्रपूरमधील पोंभुर्णा तालुक्यातील चेक आष्टा येथील पुरुषोत्तम मडावी ( 52 वर्ष ) चेक आष्टा फाट्यानजीच्या तलावात बैलाला पाणी पाजण्यासाठी गेले होते. ते परतलेच नाही. त्यांची रात्रीच्या सुमारास जंगलात शोधाशोध केली असता चिंतलधाबा बिटातील कक्ष क्र. 96 राखीव जंगलात त्यांचा मृतदेह आढळून आला. वाघाच्या हल्ल्यात पुरुषोत्तम मडावी ठार झाल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी गोंडपिपरीला पाठविण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या