
देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेल्या मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया बंगल्याबाहेर एक बेवारस कार आढळली आहे. या कारमध्ये स्फोटकं सापडल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
A suspicious vehicle found on Carmichael Rd today under limits of Gamdevi PS. Bomb Detection&Disposal Squad team&other Police teams reached spot, examined the vehicle&found some explosive material Gelatin inside. It’s not an assembled explosive device. Probe on: PRO,Mumbai Police
— ANI (@ANI) February 25, 2021
अँटिलियाबाहेर बेवारस गाडी सापडल्यानंतर तेथील सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. तसेच आजुबाजुचा परिसरही खाली करण्यात आला होता. त्यानंतर बॉम्बशोधक पथकाने तपासणी केली. त्यावेळी त्यात काही स्फोटक जिलेटीनच्या कांड्या सापडल्या. सर्व तपासणी झाल्यानंतर पोलिसांनी ती कार पोलिसांनी तिथून हटवली
A car carrying Gelatin has been found near Mukesh Ambani’s residence in Mumbai today. Mumbai Police Crime Branch is investigating the whole matter: Maharashtra Home Minister Anil Deshmukh pic.twitter.com/63SSuqT1be
— ANI (@ANI) February 25, 2021





























































