पाच वर्षांवरील मुलांचेही लसीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे लहान मुलांच्या सुरक्षेची काळजी वाटत आहे. याच अनुषंगाने ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियामधील (डीसीजीआय) तज्ञांच्या समितीने 5 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांनाही कोर्बेव्हॅक्स लस देण्यास मंजुरी दिली आहे. यावर आता ‘डीसीजीआय’ची अंतिम मंजुरी मिळताच 5 वर्षांवरील मुलांचेही लसीकरण सुरू होणार आहे.

हैदराबादच्या बायोलॉजिक-ई कंपनीने तयार केलेली कोर्बेव्हॅक्स लस 16 मार्चपासून 12 ते 14 वर्षांपर्यंतच्या मुलांना दिली जात आहे.

– मुंबईत गुरुवारी नव्या 91 रुग्णांची नोंद झाली. त्यातील 90 जणांना फक्त लक्षणे असून एकाला रुग्णालयात दाखल केले आहे. दिवसभरात 56 रुग्णांना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.