तीन वर्षांपासून होता फरार; खूनाच्या प्रयत्नातील आरोपीला अटक

खूनाच्या प्रयत्नातील तीन वर्षांपासून फरारी असलेल्या आरोपीला समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. मेहमूद बाबू घोडके (वय 56, रा. भवानी पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध विनापरवाना शस्त्र बाळगल्याच्याही गुन्हा दाखल आहे.

किरकोळ कारणातून एकाच्या खूनाचा प्रयत्न करून तीन वर्षांपासून फरार असलेला आरोपी भवानी पेठेत आल्याची माहिती पोलीस अंमलदार सुमीत खुट्टे आणि निलेश साबळे यांना मिळाली. त्यानुसार ही माहिती वरिष्ठांना कळवून सहायक पोलीस निरीक्षक संदीप जोरे आणि कर्मचाऱ्यांनी सापळा रचून आरोपी मेहमूद घोडके याला अटक केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप जेरे, सुमीत खुट्टे, निलेश साबळे, संतोष काळे, सुशील लोणकर, सुभाष पिंगळे, सुभाष मोरे, श्याम सुर्यवंशी, हेमंत पेरणे, विठ्ठल चोरमले यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या