खंडणी प्रकरणी अबू सालेमला ७ वर्षांची शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

व्यावसायिकाकडून पाच कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी कुख्यात डॉन अबू सालेम याला दिल्लीच्या पतियाळा हाऊस न्यायालयाने सात वर्षांच्या सक्तमजूरीची शिक्षा दिली आहे. या प्रकरणात अबू सालेमला २६ मे रोजी न्यायालयाने दोषी ठरविले होते.

या खंडणी प्रकरणातील इतर आरोपी माजिद खान, चंचल मेहता, पवन कुमार मित्तल, मोहम्मद अश्रफ यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. तर फक्त अबू सालेम यालाच या प्रकरणात दोषी ठरविण्यात आले आहे.

२००२ साली अबू सालेमने ग्रेटर कैलासा येथे राहणाऱ्या अशोक गुप्ता या व्यावसायिकाकडून पाच कोटींची खंडणी मागितली होती. याप्रकरणी अबू सालेमविरोधात ग्रेटर कैलासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.