ग्रँट रोडमध्ये भररस्त्यात धोकादायकरीत्या कन्स्ट्रक्शनचे काम; विचारणा करणाऱ्या रहिवाशांवर बिल्डरची दादागिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दक्षिण मुंबईत सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी असताना ग्रँट रोड पूर्व रॉक्सी सिनेमा, ऑपेरा हाऊसजवळ बिल्डरकडून धोकादायकरीत्या रस्त्यावर भलामोठा मिक्सर उभा करून कन्स्ट्रक्शनचे काम सुरू असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. यामुळे या रस्त्यावर प्रचंड वाहतूककाsंडी होत असून रहिवासी, वाहनचालकांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे. याबाबत संबधितांना विचारणा करण्यास गेलेल्या रहिवाशांना बिल्डरकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. शिवाय ‘काय करायचे ते करा, आपण कुणाला घाबरत नाही’ असा इशाराही देण्यात आला. याची दखल घेत रहिवासी यश काते यांनी डॉ. दा. भ. मार्ग पोलीस ठाण्यात संबंधित बिल्डरविरोधात ‘एफआयआर’ दाखल केला आहे.

तक्रारदार यश काते हे रविवारी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास गिरगाव येथे पतंग खरेदी करण्यासाठी जात होते. ते 2.45 वाजता ऑपेरा हाऊस रॉक्सी सिनेमासमोर आले असता रस्त्यावर धोकादायकरीत्या अवजड मिक्सर वाहन उभे करून कन्स्ट्रक्श्न सुरू असल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी भलीमोठी लोखंडी बकेटही ठेवण्यात आली होती. काम सुरू असताना त्यांनी कोणत्याही प्रकारची सुरक्षेची काळजी घेतली नव्हती. शिवाय पूर्ण रस्ता अडवल्याने काते यांनी त्यांना मिक्सर हटवण्याची विनंती केली. यावेळी संबंधित चालकाने काते यांना दमदाटी करीत वाद घालण्यास सुरुवात केली. शिवाय आपल्यावर कुणीही कारवाई करू शकत नाही, असा इशाराही दिला. त्यामुळे काते यांनी संबंधित चालक एम.डी. राजा याच्याविरोधात डॉ. दा. भ. मार्ग पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. संबंधित वाहनचालक आणि बेजबाबदार एम. डी. राजा पंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.