महिनाभर बंद खोलीत डांबलं, नशेचे पदार्थ खाऊ घालून महिलेवर अत्याचार

हरियाणातील हिसार गावातली एक विचित्र घटना समोर आली आहे. नवऱ्याशी भांडण झाल्यावर एका महिलेला महिनाभर खोलीत डांबून ठेवून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. हरियाणातील हिसार गावातील रोहतक येथे राहणाऱ्या एका महिलेचे तिच्या नवऱ्याबरोबर भांडण झाले. त्यानंतर या महिलेच्याच ओळखीतील एका महिलेने तिला हिसार या गावी नेऊन एका खोलीत बंदिस्त करून ठेवले.

तेथे तिला नशेचे पदार्थ खाऊ घालण्यात आले. तसेच तिला मारझोड करून तिच्यावर अत्याचार करण्यात आले. हा सर्व अन्याय तिने एक महिनाभर सहन केला. कठीण परिस्थितीला तोंड देत असताना एक दिवस तिचा संपर्क तिच्या नातेवाईकाशी झाला.

या नातेवाईकाने पोलिसांना सांगून त्यांच्या मदतीने पीडित महिलेची सुटका केली. सुटका झाल्यानंतर तिने हिसार पोलीस ठाण्यात अपहरणर्त्यांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.

पीडित महिलेने आरोपींची नावे पोलिसांना सांगितलेली आहेत. तसेच या प्रकरणात तीन महिलांचाही समावेश असल्याची माहिती तिने पोलिसांना दिली. पोलिसांनी पाच आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

तसेच पोलिसात तक्रार केल्यास पीडित महिलेला जीवे ठार मारण्याची धमकी आरोपींनी दिली होती. महिलेवरील अत्याचाराबाबत पोलीस नातेवाईक आणि कुटुंबीयांकडे चौकशी करून शोध घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या