दादर रेल्वे स्थानक ते केईएम रुग्णालय मार्गावर एसी बस सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेस्टमध्ये एसी मिनी बस आणि मिडी बसेसच्या फेऱया हळूहळू वाढविण्यात येत असून बुधवारपासून दादर रेल्वे स्थानक पूर्व ते केईएम रुग्णालय या मार्गावर आता वातानुकूलित बसची सुरुवात करण्यात आली आहे. एसी बसेसच किमान तिकीट अवघे सहा रुपये असून सामान्य रुग्णांची त्यामुळे चांगली सोय होणार आहे. बेस्टला पुन्हा ऊर्जितावस्था येण्यासाठी बेस्टच्या ताफ्यात वेट लिजच्या बसेसचा समावेश करण्यात येत आहे. बुधवारपासून बस मार्ग क्र.ए-217 दादर रेल्वे स्थानक पूर्व ते केईएम रुग्णालय अशी एसी बस सुरू करण्यात आली असून पहिली बस स.6.50 तर शेवटची बस रा.10.40 असणार आहे. त्यामुळे रुग्णालयात जाणाऱया पेशंटना फायदा होणार आहे. त्यामुळे मिनी, मिडीची संख्या 166 पर्यंत पोहोचली आहे.