ऊसाच्या ट्रॅक्टरच्या धडकेने शिक्षिकेचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । राहुरी

ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरची धडक बसल्याने राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथील प्राथमिक शिक्षिका जागीच ठार झाली आहे. वांबोरी जवळील कात्रड फाट्याजवळ मंगळवारी दुपारी 4 वाजता हा अपघात झाला. वांबोरी केंद्राच्या गुंजाळे येथील प्राथमिक शाळेतील शिक्षिका सुनंदा महेश कोकणे (वय 32) आपल्या स्कूटीवर गुंजाळेकडुन वांबोरीच्या दिशेने जात होत्या.यावेळी पुढे ऊस भरलेल्या ट्रॅक्टरची धडक बसल्याने त्या टॅक्टरच्या चाकाखाली सापडल्याने जागीच ठार झाल्या. दोन दिवसांपुर्वी याच मार्गावरील वांबोरी डाक बंगल्याजवळ ऊसाचा ट्रक अंगावर कलंडल्याने दोघे शेतकरी जागीच ठार झाल्याची घटना घडली होती.

अपघाताची खबर मिळताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती.वांबोरी औटपोष्टचे पोलीस कॉन्सटेबल शैलेश जाधव,कॉन्सटेबल आव्हाड यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने अपघातातील वाहने रस्त्यातून बाजुला करत मृतदेह हलविण्यात मदतकार्य केले. वांबोरी ग्रामीण रूग्णाल्यात शवविच्छेदना नंतर सायंकाळी सुनंदा कोकणे यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. नंदुरबार येथील रहिवाशी असलेले कोकणे नोकरीनिमित्ताने राहुरी विद्यापीठ येथे स्थायीक झाले आहेत. या घटनेने गुंजाळे तसेच राहुरी विद्यापीठ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.