
कोल्हापूर अँटी करप्शन ब्युरो मध्ये कार्यरत असलेल्या DYSP वैष्णवी पाटील यांच्या इनोव्हा कारला कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्याजवळ भीषण अपघात झाला आहे. बेंगळुरूवरून कोल्हापूरच्या दिशेने परतत असताना रविवारी पहाटे ही दुर्घटना घडली. वैष्णवी पाटील ज्या कारमधून प्रवास करत होत्या, ती कार अचानक एका लॉरीला जाऊन धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, कारमधील 2 सहप्रवासांचा जागीच मृत्यू झाला, तर वैष्णवी पाटील यांच्यासह तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने, DYSP वैष्णवी पाटील यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. अपघाताचे वृत्त समजताच पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून स्थानिक प्रशासन पुढील तपास करत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे कोल्हापूर पोलीस वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे.



























































