म्हशी असलेला ट्रक उड्डाणपूलावर आदळला; 8 म्हशींचा मृत्यू, 25 जखमी

छिंदवाडाहून 33 म्हशी घेऊन अमरावतीकडे भरधाव येणारा ट्रक उड्डाणपूलाला धडकल्याने अपघात झाला. या अपघातात ट्रकमधील 8 म्हशी जागीच दगावल्या. तर 25 म्हशी जखमी झाल्या आहेत. अमरावतीजवळच्या नांदगाव पेठ परिसरात ही घटना घडली. अपघातानंतर चालक-वाहक घटनास्थळावरून फरार झाले आहेत. क्लिनर वाहनात अडकल्याने त्याला पोलिसांनी बाहेर काढून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे. शुक्रवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाण्याजवळ ही घटना घडली.

छिंदवाडा येथून 33 म्हशी घेऊन अमरावतीकडे जात असताना सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास उड्डाणपूलाखालून अमरावती मार्गावर येण्यासाठी भरधाव वेगाने जात असताना ट्रक उड्डाणपूलाच्या भिंतीवर जोरदार आदळला. त्यानंतर ट्रक महामार्गाच्या विरुध्द दिशेने थेट मेजवानी हॉटेलनजीक येऊन धडकला. या घटनेत 8 म्हशी जागीच दगावल्या. तर अन्य म्हशी जखमी झाल्याने त्यांना नजीकच्या गोरक्षण येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या