कर्नाटकमध्ये खासगी विमान कोसळले; सुदैवाने जिवीतहानी टळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटकच्या विजयपुरा जिल्ह्यातील बालेश्वर तालुक्यातील मंगलुरु गावात रविवारी दुपारी एका रेड बर्ड हे खासगी मिनी विमान दुर्घटनाग्रस्त झाले. या दुर्घटनेच सुदैवाने जिवीतहानी झालेली नाही. विमानातील पायलटसह दोन्ही प्रवासी बचावले आहेत. मिनी विमान हवेत असताना तांत्रिक बिघाड झाल्याने दुर्घटना झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विमान अचानक मंगलुरु गावाजवळील एका मोकळ्या शेतात कोसळले.

विमान कोसळल्याने समोरील भाग आणि पंखांचे नुकसान झाले आहे. मात्र, विमानातील वैमानिक आणि प्रवाशांना गंभीर दुखापत झाली नाही, त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आहे. विमानाने नागरी वस्तीत कोसळले असते तर मोठा अनर्थ घडला असता. विमान मोकळ्या मैदानात कोसळल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. घटनेनंतर पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी प्राथमिक तपासाला सुरुवात केली आहे. आतापर्यंतच्या तपासात इंधनाच्या कमतरतेमुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.