
मालवण वायरी मार्गावर गुरुवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगात असणाऱ्या दुचाकीस्वाराने सायकल चालवणाऱ्या एका छोट्या मुलीस उडवल्याची घटना घडली आहे. या अपघातात मुलीला दुखापत झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेत दुचाकीस्वारही जखमी झाला आहे. वेगाने वाहन चालवल्यामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, अपघाताचा थरारक व्हिडीओ जवळच असलेल्या एका बारच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे.
या अपघातात धडक बसलेल्या मुलीला मुका मार लागला असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.































































