माजी आमदाराची गाडी केजजवळ उलटली, दुर्घटनेतून थोडक्यात बचावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्या इनोव्हा गाडीला केजजवळ शनिवारी दुपारी अपघात झाला. या अपघातात त्यांची गाडी उलटली. या अपघातातून साठे थोडक्यात बचावले आहेत. जखमी असतानाही त्यांनी एका लग्नाला उपस्थिती लावली आणि लग्न समारंभानंतर ते उपचारासाठी रूग्णालयाकडे गेले.

केजचे माजी आमदार पृथ्वीराज साठे हे केजकडे जात असताना टाकळी फाट्यावर एका दुचाकीस्वारास वाचवण्याचा प्रयत्न करत असताना गाडीला अपघात झाला. त्याची गाडी उलटली. यावेळी गाडीत त्यांच्यासह इतर दोनजण होते. या मतदारसंघाचे विद्यमान आमदार नमिताताई मुंदडा यांचे पती अक्षय मुंदडा हे त्यांच्यासोबत प्रवास करत होते. साठे यांना त्यांना सुखरुप गाडीबाहेर काढले. पृथ्वीराज साठे जखमी अवस्थेत मस्साजोग येथील एका लग्नाला उपस्थित होते. त्यानंतर ते उपचारासाठी रूग्णालयात गेले.