
हिंदुस्थानच्या लोकसंख्येबाबत संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या अहवालात धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार 2025 च्या अखेरीपर्यंत हिंदुस्थानची लोकसंख्या 1.46 अब्जपर्यंत पोहोचणार आहे. देशाचा एकूण प्रजनन दर कमी झाला आहे. जन्माला येणाऱ्या मुलांचे प्रमाण हे मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांच्या संख्येपेक्षा कमी असल्याचेही संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात म्हटले आहे. याचे प्रजनन संकट म्हणून वर्णन केले आहे. देशात अनेक कारणांमुळे मोठय़ा संख्येने लोक निपुत्रिक असल्याचेही नमूद केले आहे.