30 एप्रिलपर्यंत विद्यापीठ, महाविद्यालयांत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी कक्ष नेमा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यात चार वर्ष पदवीपूर्व पदवी अभ्यासक्रम लागू करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार विद्यापीठे आणि स्वायत्त महाविद्यालयांत 30 एप्रिलपर्यंत प्र-कुलगुरू आणि प्राचार्यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी कक्ष नेमण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याविषयीचा शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे.

उच्च शिक्षण विभागाकडून यंदापासून पदवीच्या बीए, बीएससी आणि बीकॉम, तर पदव्युत्तर पदवीच्या एमए, एमएसी आणि एमकॉम अभ्यासक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राबविण्याचे निश्चित केले आहे. चौथे वर्ष 2026-27 पासून लागू होणार आहे. राज्य सरकारने सर्व स्वायत्त महाविद्यालये आणि विद्यापीठांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठी अंमलबजावणी कक्ष स्थापन करण्यासाठी आणि सरकारी नियमांचे पालन करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंतची अंतिम मुदत दिली आहे. महाविद्यालयांनी अंतिम मुदतीच्या 10 दिवसांच्या आत कारवाईचा अहवाल सादर करायचा आहे. राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी नेमलेल्या सुकाणू समितीने काही शिफारशी केल्या होत्या. या समितीच्या शिफारशींनुसार अभ्यासक्रम आणि श्रेयांक आराखडय़ाबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना राज्य सरकारने जारी केल्या आहेत.

सुकाणू समितीच्या मार्गदर्शक सूचना

  • काही निकष पूर्ण करणाऱया महाविद्यालयांनाच चौथे वर्ष सुरू करण्याची परवानगी असेल. विद्यार्थी संख्येच्या नैसर्गिक वाढीनुसार चौथे वर्ष सुरू करता येणार नाही. केवळ तीन वर्षांचा अभ्यासक्रम चालवणाऱया आणि पीजी विभाग किंवा संशोधन पेंद्र नसलेल्या महाविद्यालयांना चार वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी परवनागी मिळणार नाही.
  • निकष पूर्ण न करणाऱया महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पदवीपूर्व पदवी अभ्यासक्रमाच्या चौथ्या वर्षांसाठी निकष पूर्ण केलेल्या अन्य महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागेल.
  • अभ्यासक्रमातून बाहेर पडायचे असल्यास विद्यार्थ्यांना प्रत्येक स्तरानंतर व्रेडिट्सचे तपशील द्यावे लागतील. उदाहरणार्थ, पहिल्या वर्षानंतर चार वर्षाच्या कार्यक्रमातून बाहेर पडणाऱया विद्यार्थ्यांना यूजी प्रमाणपत्रासह किमान 40 व्रेडिट्स मिळवणे आवश्यक आहे. ज्यात व्यावसायिक अभ्यासक्रमातील चार व्रेडिट्स किंवा मुख्यशी संबंधित इंटर्नशिप आणि कौशल्य-आधारित अभ्यासक्रमांमधील सहा क्रेडिटस् समावेश असेल.
  • विद्यार्थी बाहेर पडल्यानंतर तीन वर्षांच्या आत अभ्यासक्रमात पुन्हा प्रवेश करू शकतात, परंतु त्यांनी संपूर्ण कार्यक्रम सात वर्षांच्या आत पूर्ण करणे आवश्यक आहे.
  • चौथ्या वर्षात प्रवेश घ्यायचा असल्यास 7.5 सीजीपीए किंवा तीन वर्ष पदवी अभ्यासक्रमात 75 टक्के गुण असे आवश्यक आहेत.