हायकोर्टात महिलेच्या पर्समधील पैसे चोरले, वसईतील चोराला पोलिसांनी पकडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

खटल्याची तारीख असल्याने उच्च न्यायालयात आलेल्या महिलेच्या पर्समधील साडेआठ हजारांची रेकड चोरून पसार झालेल्या चोरटय़ाच्या आझाद मैदान पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. सीसीटीव्ही व खबऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी चोराला पकडले.

शीतल पंडिया (38) या 4 एप्रिलला उच्च न्यायालयात त्यांच्याशी संबंधित दाखल एका खटल्याचा युक्तिवाद सुरू असल्याने आल्या होत्या. दरम्यान, कोर्टातच त्यांच्या बॅगेतून आठ हजार चारशे रुपयांची रोकड काढून नेली. आपले पैसे चोरीला गेल्याचे कळताच पंडिया यांनी आझाद मैदान पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय रवींद्र मोहिते व पथकाने गुह्याचा तपास सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच खबऱ्यांना कामाला लावले. दरम्यान, त्या गुह्यातील आरोपी कोर्टात येणार असल्याची खबर मिळताच पोलिसांनी सापळा रचून वसईच्या फणसपाडा येथे राहणाऱ्या राहुल अबनवे (28) याला ताब्यात घेतले.