
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
चोरी व घरफोडीचे गुन्हे उघड करण्यात अखेर गुन्हे शाखेला यश आलेच. तडीपार असलेला अट्टल चोरटा मोगली व त्याच्या साथीदारांकडून शहराच्या विविध भागांतील आठ घरफोडींमधील सात तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे यापूर्वीही गुन्हे शाखेचे सोनवणे यांच्या पथकाने या दोघा चोरट्यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून १९ तोळे सोने आणि ४० हजारांची रोख रक्कम जप्त केली होती.
शहरात वाढत्या चोऱ्या व घरफोड्यांमुळे हैराण झालेल्या गुन्हे शाखेच्या पथकाने शहरात खबरे नेमले होते. खबNयांच्या माहितीवरून चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी कांचनवाडी परिसरात आलेला क्रांतिनगरातील सूर्यकांत ऊर्पâ सनी गोपीनाथ जाधव आणि एकनाथनगरातील स्वप्निल उर्फ मोगली रमेश कुलकर्णी या दोघांना गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या पथकाने ताब्यात घेतले. ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या खिशात सोन्याचे दागिने आढळून आले. पोलिसी खाक्या दाखवनू विचारपूस करताच दोघांनी जिन्सी हद्दीत दोन, गुरुगोविंदसिंगपुरा परिसरात दोन, सातारा परिसरात दोन आणि मुकुंदवाडी आणि पुंडलिकनगर हद्दीत प्रत्येकी एक अशा एकूण आठ घरफोड्याची कबुली दिली.
उपनिरीक्षक अनिल वाघ, सुभाष शेवाळे, सय्यद अशरफ यांच्या पथकाने सनी आणि मोगली यांच्या ताब्यातून सात तोळे सोन्याचे दागिने, लॅपटॉप, मोबाईल असा एवूâण अडीच लाखांचा ऐवज जप्त करत दोघांना गुरुगोविंदसिंगपुरा पोलिसांच्या ताब्यात दिले.
तडीपार असताना शहरात मुक्काम
रेकॉर्डवरील अट्टल चोरटे सनी आणि मोगली या दोघांना शहरातून तडीपार करण्यात आले होते. तडीपार असतानासुद्धा दोघांनी शहरात बिनधास्त चोरी व घरफोडी करून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे उघड झाले. मागील दोन महिन्यांत त्यांनी आठ घरे फोडल्याची कबुली दिली. यापूर्वीही गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या पथकाने या दोघांच्या ताब्यातून सातारा हद्दीतून चोरलेले ११ तोळे सोने तर दुसऱ्या वेळेस गुरुगोविंदसिंगपुरा भागातील घरफोडीतील सात तोळे सोने आणि ४० हजारांची रोख रक्कम जप्त केली होती तर गुरुगोविंदसिंगपुरा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कल्याण शेळके यांनी या दोघांच्या ताब्यातून लाखो रुपयांचे दागिने जप्त केलेले आहेत.




























































