बलात्कार पीडितेवर फेकले ऍसिड, खटला मागे घेण्यासाठी होता दबाव

772

उन्नाव बलात्कार पीडितेच्या मृत्यूची घटना ताजी असताना उत्तर प्रदेशमध्येच मुझफ्फरनगरमध्ये बलात्कार पीडितेवर आरोपींनीच ऍसिड हल्ला केला आहे. या हल्ल्यात पीडित महिला 30 टक्के भाजली आहे. तिला तत्काळ जवळच्या इस्पितळात दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. ज्या आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला त्यांनी पीडितेवर खटला मागे घेण्यासाठी दबाव टाकला. तिने नकार दिल्यानंतर आरोपींनी तिच्यावर ऍसिडच फेकले.

पीडित महिलेने चार आरोपींविरोधात कोर्टात बलात्काराची केस दाखल केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर महिलेने आधी चार आरोपींविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. परंतु तपासादरम्यान काही ठोस पुरावे न मिळाल्याने चौघांना सोडून देण्यात आले. त्यामुळे महिलेने आरोपींविरोधात केस दाखल केली. त्यामुळे आरोपी चिडले होते. आरोपींनी पीडित महिलेवर केस मागे घेण्यासाठी दबाव टाकला. परंतु महिला बधली नाही आणि केस मागे घेण्यास नकार दिला. तेव्हा आरोपींनी पीडित महिलेवर ऍसिड फेकले आणि पोबारा केला.

आरिफ, शाहनवाज़, शरीफ आणि अबीद अशी आरोपींची नावे असून सर्व फरार आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून त्यांचा कसून शोध घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या