लॉकडाऊनच्या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 200 दुचाकी चालकांवर कारवाई

556

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. इतर जिल्हातून परभणी आणि सेलूमध्ये नागरिक परतत असल्याने या जिल्ह्यात कोरोनाच फैलाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात विनाकारण फिरणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकी चालकांवर सेलूमध्ये कारवाई करण्यात आली. पोलीस, नगरपालिका आणि महसूल विभागाच्या वतीने सेलू येथे 200 दुचाकी चालकांवर कारवाई करण्यात आली.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी विनाकारण बाहेर फिरू नये, दुचाकीवर एकच व्यक्ती असावी, डबल सीट, ट्रिपल सीट जाऊ नये, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे असे आवाहन जनतेला करण्यात आले होते. पोलीस, नगरपालिका आणि महसूल विभागाच्या पथकाने 22 मे रोजी 100 वाहनावर दंडात्मक कारवाई करून 15 हजार रुपयांचा दंड वसूल केला. सेलू येथील पाथरी नाक्याजवळ सकाळी 10 वाजल्यापासून दुचाकीवर डबलसीट, ट्रिपलसीट जाणाऱ्या 92 दुचाकीचालकांवर कारवाई केली तसेच त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या