
बाबा भोलेनाथांचा आशीर्वाद घेण्यासाठी अभिनेता अक्षय कुमार आज केदारनाथ धाम येथे पोहोचला. दरम्यान अक्षयने कपाळावर टिळा लावल्याचा आणि गळ्यात माळ घातल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यानंतर लोकांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
अभिनेता अक्षय कुमार परमेश्वराचे आशीर्वाद घेण्यासाठी तो अनेकदा मंदिरात जातो. यावेळी तो भोलेनाथांच्या दर्शनासाठी केदारनाथ येथे पोहोचला. अक्षय कुमारने कपाळावर लाल आणि पिवळा टिळा लावून, गळ्यात रुद्राक्षाची माळ घालून बाबा भोलेनाथांची पूजा केली. केदारनाथ मंदिराच्या आवारातून बाहेर पडताना त्यांनी चाहत्यांना हात जोडून अभिवादन केले. मग अक्षय कुमार नेमका सोशल मीडियावर का ट्रोल होतोय? चला जाणून घेऊया.
अक्षय कुमार केदारनाथ येथे गेल्यापासून सोशल मीडियावर लोक त्याला ट्रोल करत आहेत. याआधी ‘ओएमजी: ओ माय गॉड!’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान अक्षय कुमारने मंदिरात पूजा करण्याऐवजी गरिबांना मदत करा असे म्हटले होते. एवढेच नाही तर मंदिरात जाऊन दूध आणि तेल वाया घालवण्याची काय गरज आहे? हे दूध आणि तेल आपण एखाद्या गरीबाला दिले तर बरे होईल.” असेही त्याने म्हटले होते. याच कारणामुळे अक्षय कुमार सध्या ट्रोल होत आहे.
अक्षय कुमारचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून लोक त्याला दुतोंडी असे म्हणत आहेत. “अक्षय कुमार बॉयकॉट ट्रेंडला घाबरला आहे, म्हणून तो बाबा भोलेनाथांच्या आश्रयाला गेला” असल्याचेही लोक म्हणत आहेत.

























































