
कोरोना महामारीतून निर्माण झालेल्या अस्थिरतेचा फटका चित्रपटसृष्टीलाही प्रचंड प्रमाणात बसला आहे. अशा परिस्थितीत मदतीचे असंख्य हात पुढे सरसावले आहेत. असाच मदतीचा हात पुढे करत ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला सहकार्य केले आहे.
‘बिग बाजार’चे 1500 रुपयाचे 500 कूपन्स अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाकडे सुपूर्द केले आहेत. नुकतेच महामंडळाच्या 500 सभासदांना या कूपन्सचे वाटप करण्यात आले. या कूपन्स अंतर्गत जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता येणार आहे.
या मदतीबद्दल ‘अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा’चे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी अमिताभ बच्चन यांचे आभार मानले आहेत.



























































