बलात्कार व खंडणी प्रकरण,अभिनेता करण ऑबेरॉयला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार करून तिच्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी अभिनेता-मॉडेल करण ऑबेरॉय याला ओशिवरा पोलिसांनी अटक केली. करणने ‘जस्सी जैसी कोई नही’,  ‘इन्साईड एज’ यासारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम केले होते.

सागरिका (नाव बदललेले) या तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून करणच्या ओशिवरा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. 2016 पासून करणसोबत तिचे  प्रेमसंबंध होते. आपण लग्न करू असे सांगत त्याने माझ्यावर बलात्कार केला. इतकेच नाही तर त्याने माझे काही अश्लील व्हिडीओदेखील बनवले. त्यानंतर पैसे दे नाहीतर ते व्हिडीओ क्लिप व्हायरल करीन असे धमकावत तो माझ्याकडे खंडणी मागू लागला असे या तरुणीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार ओशिवरा पोलिसांनी करण ऑबेरॉय याच्या विरोधात बलात्कार आणि खंडणीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.