अभिनेते नसीरुद्दीन शाह यांना डिस्चार्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून बुधवारी सकाळी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. न्यूमोनियावरील उपचारांसाठी त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल केले होते. नसीरुद्दीन शाह रुग्णालयातून घरी परतल्याची माहिती त्यांचा मुलगा विवान शाह याने दिली आहे. ‘बॅक टू होम’ असे कॅप्शन देत विवानने वडिलांचे फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केले आहेत. 29 जूनला नसीरुद्दीन यांना रुग्णालयात दाखल केले होते. नसीरुद्दीन यांच्या फुप्फुसांमध्ये न्यूमोनियाचा एक छोटा पॅच असून त्यावर उपचार सुरू असल्याची माहिती त्यांची पत्नी, अभिनेत्री रत्ना पाठक-शाह यांनी दिली होती. योग्य उपचार घेऊन ते सुखरूप घरी परतल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.