
अभिनेता पियुष रानडे आणि ‘का रे दुरावा’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुरुची अडारकर आज विवाहबंधनात अडकले आहेत. याबाबत सुरुचीने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. तिच्या या पोस्टवर अनेक कलाकार आणि चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
सुरुचीने इंस्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सुरुची नववधूच्या रुपात दिसत आहे. तर अभिनेता पियुष रानडे तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालताना दिसत आहे. सुरुचीने फोटो पोस्ट करताना आनंदाचा दिवस असे कॅप्शन दिले आहे. #PSILoveYou असा हॅशटॅग देत बदामाचा इमोजी शेअर केला आहे. दोघांनी पिवळ्या रंगाचे कपडे घातले आहेत. दोघांनी गुपचूप लग्न केले आहे.
View this post on Instagram
पियुष आणि सुरुचीने ‘अंजली’ या मालिकेत एकत्र काम केले होते. दोघांनी आपल्या नात्याची वाच्छता कुठेही केली नाही. अचानक फोटो शेअर केल्याने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पियुषच्या खासगी आयुष्याबाबत बोलायचे तर त्याचे हे तिसरे लग्न आहे. अभिनेत्री शाल्मली टोळ्ये ही त्याची पहिली पत्नी तर अभिनेत्री मयुरी वाघ त्याची दुसरी पत्नी होती. मात्र दोघांसोबतही काही वर्षातच घटस्फोट घेतला.
























































