लोकनाट्य गाजवणारे अभिनेते राजा मयेकर यांचं निधन

937

लोकनाट्याचा राजा अशी ओळख असलेले ज्येष्ठ रंगकर्मी राजा मयेकर यांचे शनिवारी दुपारी 12 च्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. राजा मयेकर यांनी 60 वर्षांहून अधिक काळ त्यांच्या विनोदी भुमिकांनी प्रेक्षकांना हसवलं. त्यांनी त्यांच्या अभिनयाने नाटक, सिनेमा व मालिका या सर्व क्षेत्रात त्यांचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी आणि नातवंडं असं परिवार आहे.

राजा मयेकरांची खरी सुरुवात झाली ती शाहिर साबळे यांच्या लोकनाट्यातील भुमिकांमधून. आंधळं दळतंय, यमराज्यात एक रात्र, असूनी खास घरचा मालक, बापाचा बाप, नशीब फुटकं सांधून घ्या, कोयना स्वयंवर या प्रायोगिक नाटकातन ते लोकांच्या समोर आले. त्यानंतर गुंतता हृदय हे, गहिरे पाणी, श्यामची आई, धांदलीत धांदल, भावबंधन, एकच प्याला, संशयकल्लोळ, बेबंदशाही, झुंजारराव अशा गाजलेल्या व्यावसायिक नाटकातही त्यांनी काम केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या