प्रसिद्ध अभिनेते रिओ कपाडीया यांचे निधन

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते रिओ कपाड़ीया यांचे निधन झाले आहे. ते 66 वर्षांचे होते. गेल्या वर्षी कपाडीया यांना कर्करोग झाल्याचे समजले होते. अखेर उपचारादरम्यान शुक्रवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

रिओ कपाडी यांनी चक दे इंडिया, हॅपी न्यू ईयर, मर्दानी, एजंट विनोद अशा अनेक हीट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. मेड इन हेवन -2 या वेबसिरीजमध्येही ते दिसले होते. त्या व्यतिरीक्त त्यांनी हिंदी मालिकांमध्येही काम केले आहे.

रिओ यांच्या पार्थिव शरीरावर शुक्रवारी गोरेगाव येथील शिव धाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे.