रितेशचं ‘वेड’ झालं पूर्ण!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेता रितेश देशमुख आगामी ‘वेड’ या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण करतोय.  आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर त्याच्या या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत रितेश म्हणाला, ‘पांडुरंगाच्या साक्षीने मी मराठी चित्रपट क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि आज त्याच विठूमाऊलीच्या आषाढीला सांगताना अतिशय आनंद होतोय की, मी दिग्दर्शित केलेल्या पहिल्या मराठी चित्रपटाचं चित्रीकरण नुकतंच पूर्ण झालं आहे.

अनेक अडचणींतून मार्ग काढत पहिला टप्पा यशस्वीपणे पार केलाय’. पुढे तो म्हणाला, आता पुढचा पूर्णत्वाचा प्रवास आणखी बरंच शिकवणारा असेल. जर तुमच्या पाठीशी तुमची जिवाभावाची माणसं असतील तर हा प्रवास आणखी सोपा होतो. अशाच एका जिवाभावाच्या माणसाची साथ आमच्या चित्रपटाला लाभली ते म्हणजे ‘सलमान भाऊ’. माझ्या पहिल्या मराठी चित्रपटाला भाऊनी ‘लई भारी’ साथ दिली होती. आता भाऊने माझ्या पहिल्या दिग्दर्शकीय चित्रपटात आणखी एक वेड केलंय, असे म्हणत त्याने सलमानचे आभार मानले आहेत. ‘आता वेडेपणा सुरू होणार आहे. तेव्हा भेटू या लवकरच चित्रपटगृहात’ असे पोस्टच्या शेवटी त्याने म्हटलेय.