
जागतिक दूरचित्रवाणी दिनानिमित्त अभिनेता सुबोध भावे याने छोटय़ा पडद्यावरील आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
सुबोध म्हणाला, अल्फा मराठीवरील गीत रामायण मालिकेतील प्रभू श्रीरामाच्या भूमिकेद्वारे मी व्यावसायिक अभिनेता म्हणून प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर अनेक मालिकांतून प्रेक्षकांसमोर आलो ते आताच्या चंद्र आहे साक्षीलापर्यंत. प्रभू श्रीराम ते श्रीधर काळे. छोटय़ा पडद्याने मला खऱया अर्थाने ओळख दिली आणि घराघरांत पोहोचवले.

























































